Sugarcane Varieties: कमी पाण्यातही भरघोस उत्पादन देणारे ऊस वाण

Swarali Pawar

कोणता ऊस लावाल?

यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने योग्य वाणांची निवड महत्त्वाची आहे. कमी पाण्यात तग धरणारे वाण उत्पादन टिकवण्यास मदत करतात.

Sugarcane Variety Selection | Agrowon

Co. ८६०३२चा मोठा फायदा

हा वाण कमी पाण्यातही चांगली वाढ आणि जास्त फुटवे देतो. साखर उत्पादन चांगले मिळत असल्याने हा शेतकऱ्यांचा लोकप्रिय वाण आहे.

CO 86032 | Agrowon

VSI ०८००५ दुष्काळातही तगडा

ही जात पाण्याचा ताण सहन करण्यात सक्षम मानली जाते. मर्यादित सिंचनाखालीही चांगले उत्पादन आणि साखर उतारा देते.

VSI 08005 | Agrowon

CoM ०२६५ क्षारपड जमिनीसाठी उत्तम

चोपण आणि क्षारयुक्त जमिनीतही हा वाण चांगला वाढतो. कमी सुपीक जमिनीत उत्पादन टिकवण्यासाठी ही जात फायदेशीर ठरते.

COM 0265 | Agrowon

Co VSI ९८०५ आंतरपिकासाठी योग्य

या जातीमध्ये ओळीतील अंतर जास्त ठेवता येते. त्यामुळे आंतरपिकासोबतही चांगले उत्पादन घेणे शक्य होते.

Co VSI 9805 | Agrowon

PDN १५०१२ साखर उताऱ्यात पुढे

ही जात जास्त ऊस आणि अधिक साखर उत्पादनासाठी ओळखली जाते. खोडवा पीकही चांगले येत असल्याने खर्च कमी होतो.

PD 15012 | Agrowon

PDN १३००७ रोगप्रतिकारक्षम वाण

ही जात दुष्काळातही चांगली टिकून राहते आणि उत्पादन देते. लाल कूज, काणी आणि तांबेरा रोगांना प्रतिकारक मानली जाते.

PDN 13007 | Agrowon

नुकसान कमी

कमी पाण्यात तग धरणारे वाण निवडणे आता गरजेचे ठरत आहे. योग्य वाण आणि व्यवस्थापनामुळे ऊस उत्पादन स्थिर ठेवता येते.

Less Risk | Agrowon

Soybean Lagwad: यंदा कमी पाऊस? सोयाबीन लागवड करताना हे नियोजन ठरेल फायदेशीर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी..