Soybean Lagwad: यंदा कमी पाऊस? सोयाबीन लागवड करताना हे नियोजन ठरेल फायदेशीर

Swarali Pawar

कमी पावसातही सोयाबीन शक्य!

यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने योग्य नियोजन गरजेचे आहे. योग्य वाण, बीजप्रक्रिया आणि मशागत केल्यास नुकसान कमी होते.

Soybean Farming in Low Rainfall | Agrowon

योग्य वाणांची निवड करा

कमी पाण्यात तग धरणाऱ्या जातींची निवड फायदेशीर ठरते. जेएस-९३०५, जेएस-३३५ आणि फुले दूर्वा या जाती उपयुक्त आहेत.

Soybean Variety Selection | Agrowon

उगवणक्षमता चाचणी विसरू नका

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे. ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण असेल तर बी योग्य समजावे.

Seed Germination Test | Agrowon

घरच्या घरी करा उगवण चाचणी

ओल्या कापडात १०० बियाणे ठेवून सावलीत जपून ठेवावीत. ५ ते ७ दिवसांनी किती बियाण्यांना अंकुर फुटले ते तपासावे.

Seed Germination at Home | Agrowon

बीजप्रक्रिया का महत्त्वाची?

बियाण्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशक प्रक्रिया करावी. यामुळे रोग आणि रसशोषक किडींपासून सुरुवातीचे संरक्षण मिळते.

Why seed treatment is important | Agrowon

जिवाणू खतांचा फायदा घ्या

रायझोबियम आणि पीएसबीची प्रक्रिया खत बचतीस मदत करते. यामुळे पिकाला नत्र आणि स्फुरद अधिक प्रमाणात उपलब्ध होते.

Use Biofertilizers | Agrowon

योग्य मशागत गरजेची

बीबीएफ किंवा सरी-वरंबा पद्धतीने रानबांधणी करावी. यामुळे ओलावा टिकतो आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.

Soil Preparation | Agrowon

शेणखत आणि ट्रायकोडर्मा वापरा

जमिनीत कुजलेले शेणखत मिसळल्यास माती सुपीक राहते. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

FYM and Trichoderma | Agrowon

Fertilizer Management: कमी खतांतही घ्या भरघोस उत्पादन!

अधिक माहितीसाठी...