Swapnil Shinde
नागपूर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला फटका बसला आहे.
अतिवृष्टी व बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कृषीमंत्र्यांनी आज स्वतः शेताच्या बांधावर जात खरीप पिकांची पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनवर ‘पिवळ्या मोझॅक ’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती दिली.
सोयाबीनचे दाणे भरलेच नसल्याचे निदर्शनास आले.
अनेक शेतकऱ्यांनी संपूर्ण पीक वाया गेल्याने अक्षरशः उभ्या पीकावर रोटावेटर फिरवल्याचे सांगितले.
सोयाबीनचे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचनामे करून एसडीआरएफ व एनडीआरएफ नियमानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.