Sugarcane Waterlogging: अतिवृष्टीनंतर उसाची अशी घ्या काळजी! किडी-रोग रोखून उत्पादन वाचवा

Swarali Pawar

पाऊस झाला... आता उसाची काळजी!

जोरदार पावसानंतर शेतात पाणी साचल्यास उसाच्या वाढीवर परिणाम होतो. वेळीच योग्य उपाय केल्यास किडी, रोग आणि उत्पादनातील नुकसान टाळता येते.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

सर्वप्रथम पाण्याचा निचरा

शेतात साचलेले पाणी त्वरित बाहेर काढा आणि चर तयार करा. यामुळे मुळांना हवा मिळून उसाची वाढ पुन्हा सुरळीत होते.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

पानं पिवळी का पडतात?

पाणी साचल्यामुळे मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि अन्नद्रव्यांचे शोषण घटते. त्यामुळे नत्र, लोह आणि गंधकाची कमतरता होऊन पानं पिवळी पडतात.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

उसाला पुन्हा जोम द्या

वाळलेली आणि कुजलेली पानं काढून शेतात हवा खेळती ठेवा. त्यानंतर शिफारशीनुसार नत्र, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करा.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

फवारणीचा होईल फायदा

डीएपी, युरिया आणि पालाश यांची शिफारशीनुसार फवारणी करा. यामुळे पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

जैविक खतांचाही वापर करा

नत्र स्थिर करणारे आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण सुधारून पिकाची वाढ चांगली होते.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

या रोगांवर ठेवा लक्ष

दमट हवामानात तांबेरा, पोक्का बोईंग, तपकिरी ठिपके आणि मुळकुज वाढू शकते. लक्षणे दिसताच शिफारशीनुसार मॅन्कोझेबची फवारणी करा.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

किडींचेही वेळीच नियंत्रण करा

कांडीकीड आणि खोडकीडीचा प्रादुर्भाव नियमित तपासत राहा. शिफारशीनुसार क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोलची फवारणी करून उसाचे संरक्षण करा.

Sugarcane After Heavy Rain | Agrowon

Paddy Fertilizers: भातासाठी संपूर्ण खत व्यवस्थापनसाठी तज्ज्ञांचा सल्ला!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...