Swarali Pawar
भाताच्या चांगल्या वाढीसाठी संतुलित खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यास उत्पादन वाढते.
लागवडीवेळी १० ते १२ टन शेणखत किंवा कंपोस्ट जमिनीत मिसळा. गांडूळ खत आणि अझोला वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढते.
प्रति हेक्टर १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्या. यासोबत २० किलो झिंक सल्फेट वापरण्याची शिफारस आहे.
चिखलणीच्या वेळी ४० किलो नत्र द्या. उरलेले नत्र दोन हप्त्यांत फुटवे आणि लोंब्या येताना द्या.
संकरित जातींसाठी प्रति हेक्टर १५० किलो नत्र द्यावे. स्फुरद ५० किलो आणि पालाश ५० किलो ठेवावे.
पुनर्लागवडीवेळी कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट वापरल्यास खतांची बचत होते. यामुळे अन्नद्रव्यांचा अधिक कार्यक्षम वापर होतो.
झिंक, बोरॉन आणि सिलिकॉन भाताच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. झिंकची कमतरता दिसल्यास चिलेटेड झिंकची फवारणी करा.
धैंचा किंवा तागासारखे हिरवळीचे खत शेतात गाडा. यामुळे सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीची सुपीकता आणि भाताचे उत्पादन सुधारते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.