Anuradha Vipat
गणपती बाप्पा हा अत्यंत भोळा आणि भक्तांच्या साध्या नवसालाही पावणारा देव मानला जातो.
या गणेशोत्सवात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी अत्यंत सोपे व अचूक उपाय आपण घरच्या घरी करू शकतो!
गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दररोज किंवा दर बुधवारी बाप्पाला २१ दुर्वांची जोडी एकत्र बांधून अर्पण करा.
बाप्पाला शमीची पाने अर्पण केल्याने बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतो.शमीची पाने वाहिल्याने घरातील गरिबी दूर होते.
बाप्पाला 'मोदकप्रिय' म्हटले जाते . जर रोज मोदक बनवणे शक्य नसेल, तर बाप्पाला गूळ आणि ओल्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
सकाळी किंवा संध्याकाळी बाप्पाच्या मूर्तीसमोर दिवा लावून "ॐ गं गणपतये नमः" या सोप्या मंत्राचा १०८ वेळा जप करा .
घरात सुख आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सिंदूर आणि गाईचे तूप एकत्र करून 'स्वस्तिक' काढावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.