Tomato Crop Management: उन्हाळ्यात टोमॅटो पीक वाचवा! तज्ज्ञांचे सोपे उपाय

Swarali Pawar

टोमॅटोवर उन्हाचा ताण!

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे टोमॅटो पिकावर मोठा परिणाम होतो. वेळीच उपाय केले तर नुकसान टाळता येते आणि उत्पादन टिकवता येते.

Summer Heat Stress | Agrowon

उन्हामुळे नुकसान ?

जास्त तापमानामुळे पिकाची वाढ कमी होते आणि फुलगळ वाढते. परागीभवन कमी होऊन फळधारणाही घटते.

Summer Damage to Tomato | Agrowon

कीड-रोगांचा प्रादुर्भाव

उन्हामुळे पांढरी माशी, कोळी, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव वाढतो. टोमॅटो लिफ कर्ल व्हायरससारखे रोगही मोठ्या प्रमाणात दिसतात.

Pest Disease Attack | Agrowon

पाणी देताना..

पिकाला सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्यावे. दुपारी पाणी दिल्यास पिकावर ताण येतो आणि नुकसान होते.

Water MAnagement to Tomato | Agrowon

आच्छादनाचा फायदा

मल्चिंग केल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो. तापमान कमी राहून पिकाची वाढ चांगली होते.

Mulching Benefit | Agrowon

फुलगळ थांबवण्यासाठी उपाय

एन.ए.ए. १५ पीपीएम फवारणी केल्यास फुलगळ कमी होते. केओलीन फवारणीमुळे पानांचे तापमान कमी राहते.

Hormone Spraying | Agrowon

कीड-रोग नियंत्रण?

योग्य बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी करा. पिकाची नियमित पाहणी करून वेळेत उपाययोजना करा.

Disease and Pest Management | Agrowon

नियोजन गरजेचं

योग्य पाणी, आच्छादन आणि फवारणी केल्यास नुकसान कमी होते. उन्हाळ्यातही टोमॅटोचे चांगले उत्पादन मिळवता येते.

Management Needed | Agrowon

Bordeaux Paste: घरच्या घरी बनवा फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट आणि रोगांपासून संरक्षण करा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...