Bordeaux Paste: घरच्या घरी बनवा फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट आणि रोगांपासून संरक्षण करा

Swarali Pawar

झाडांना जखम?

पाऊस, गारपीट किंवा छाटणीनंतर झाडांना जखमा होतात. यावर वेळीच बोर्डो पेस्ट लावल्यास झाडांचे संरक्षण करता येते.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

बोर्डो पेस्ट का वापरावी?

बोर्डो पेस्ट बुरशी आणि जिवाणूंना रोखण्याचं काम करते. जखमांवर संरक्षक थर तयार होऊन रोगांचा प्रसार थांबतो.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

कोणते साहित्य लागेल?

मोरचूद पावडर, कळीचा चुना, पाणी, प्लास्टिक बादल्या लागतात. तसंच ब्रश आणि लाकडी काठीही तयार ठेवा.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

बनवण्याची सोपी पद्धत

१ किलो मोरचूद ५ लिटर पाण्यात आणि १ किलो चुना ५ लिटर पाण्यात विरघळवा. दोन्ही द्रावण एकत्र करून नीट ढवळा, पेस्ट तयार होईल.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

कसं लावाल?

तयार पेस्ट झाडाच्या बुंध्याला ब्रशने लावा. जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत लावणं योग्य ठरतं.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

कधी लावावी?

पावसाच्या आधी आणि पावसाळ्यानंतर वर्षातून दोन वेळा लावा. छाटणीनंतर लगेच लावल्यास अधिक फायदा होतो.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

वापरताना काय टाळाल?

लोखंडी भांड्यात पेस्ट बनवू नका, त्यामुळे रासायनिक प्रतिक्रिया होते. जास्त किंवा खूप पातळ पेस्ट लावल्यास झाडाला नुकसान होऊ शकतं.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

बोर्डो मिक्सचरही उपयोगी

फवारणीसाठी बोर्डो मिक्सचर वापरता येतं, जे पानांचे संरक्षण करते. यामुळे बुरशीजन्य रोग कमी होऊन उत्पादन टिकून राहतं.

Bordeaux Paste Preparation | Agrowon

Kanda Sad Upay: कापणीनंतर कांद्याची सड टाळा! सोप्या उपायांनी नुकसान वाचवा

अधिक माहितीसाठी...