Sangli Bailgada Sharyat : साताराच्या बैलजोडीने पटकावला 'जयंत केसरी किताब'; जिंकला १ बीएचके फ्लॅट

Aslam Abdul Shanedivan

कासेगावमध्ये बैलगाडी शर्यत

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या कासेगावमध्ये बैलगाडी शर्यत संपन्न झाली

Sangli Bailgada Sharyat | agrowon

जयंत केसरी बैलगाडा शर्यत

ही शर्यत 'जयंत केसरी बैलगाडा शर्यत' नावाने शरद लाहीगडे फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

Sangli Bailgada Sharyat | agrowon

पहिले बक्षीस वन बीएचके फ्लॅट

विशेष म्हणजे ही शर्यत वीस एकर माळरानावर ठेवण्यात आली होती. ज्यात पहिले बक्षीस वन बीएचके फ्लॅट आणि लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

Sangli Bailgada Sharyat | agrowon

अडीचशेपेक्षा अधिक बैलगाडी स्पर्धक

महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये प्रदेश येथून सुमारे अडीचशेपेक्षा अधिक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर जयंत पाटील हे स्वत: उपस्थित होते.

Sangli Bailgada Sharyat | agrowon

रायफल आणि शंभू बैलजोडी

'जयंत केसरी बैलगाडा शर्यत' सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने मारत मालकाच्या नावे वन बीएचके फ्लॅट जिंकला.

Sangli Bailgada Sharyat | agrowon

जयंत पाटील यांचे ट्वीट

यावेळी जयंत पाटील यांनी बैलगाडी चालकांना बक्षीस देतना, हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचा आंनद लुटला, असे त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी ट्वीटवरुन विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

Sangli Bailgada Sharyat | agrowon

कार्यकर्त्यांमध्ये चैत्यन्य

राष्ट्रवादीमधील बंडानंतर वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सांगलीतील कार्यकर्त्यांमध्ये चैत्यन्य निर्माण करण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे.

Sangli Bailgada Sharyat | agrowon

Poultry Farming : कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण कसे करावे?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा