Sahyadri : सह्याद्री हे असे मोहक रूप दाखवतं!

Manoj Kapade

सारे रान थंडीने गोठून गेले होते. ते वातावरण म्हणजे पावसाच्या पाऊलखुणा होत्या. अगदी डिसेंबरमध्येही सह्याद्री हे असे मोहक रूप दाखवत होता.

Manoj Kapde

आजची भटकंती गुलाबी थंडी, दाट धुके आणि भिजलेल्या रानवाटांमधून झाली. गवत, पाने, फुले, पायवाटा सारे जण चिंब भिजलेले होते ते दवामुळे.

Manoj Kapde

पहाटेच्या दवाचे जलबिंदू पावसाच्या पाण्यापेक्षाही थंड असतात. तरीही अशा थंड रानात कोणी आपला जीवनक्रम विस्कळीत होऊ दिला नव्हता.

Manoj Kapde

कारण, खोल दरीत पसरलेल्या धुक्याला अंगावर घेत पांढरी फुले उत्साहाने डुलत होती. लालसर रानफळे राखी पक्ष्यांची वाट पहात होती.

Manoj Kapde

डोंगरधारेवरील रानफुलाच्या कळ्या मोत्यासारखे गोंडे घालून प्रभातपर्वाच्या स्वागताला उभ्या होत्या. एक पुरते उमलून आलेले पांढरे शुभ्र फुल मधुकण हाती घेत कालच्या भुंग्याची पुन्हा आतुरतेने वाट पाहत होते.

Manoj Kapde

चार-पाच तासाची ती डोंगरधार उतरुन मी पुन्हा गावाकडे निघालो. त्यावेळी एक कष्टकरी माय बिगी बिगी आपल्या गुरांना घेऊन डोंगराकडे निघाली होती.

Manoj Kapde

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Kapde