Ratnadeep Dairy : ४० वर्षे फेमस बासुंदीवाले, मादनाईक कुटुंबाची यशस्वी वाटचाल

sandeep Shirguppe

उदगावचे मादनाईक कुटुंबीय

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील उदगाव (ता. शिरोळ) येथे कुबेर मादनाईक यांचे एकत्रित कुटुंब वास्तव्यास आहे.

Ratnadeep Dairy | agrowon

रत्नदिप दुग्धालय

कुटुंबाचे जयसिंगपूर येथे न्यू रत्नदीप दुग्धालय नावाने दुकान आहे. तिथेच दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती व विक्री होते.

Ratnadeep Dairy | agrowon

४० वर्षे व्यवसाय

सन १९८४ पासून कुटुंबाला या व्यवसायाची परंपरा असून ती आजगायत यशस्वीपणे टिकवण्यात कुटुंबाला यश आले आहे.

Ratnadeep Dairy | agrowon

गोड पदार्थ

कुटुंबाच्या मदतीने बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड, पनीर, तूप, सीताफळ, आंबा व गुलकंद रबडी, दही, ताक पदार्थ बनवतात.

Ratnadeep Dairy | agrowon

बासुंदी विशेष

मादनाईक यांच्याकडील बासुंदी विशेष प्रसिद्ध आहे. मलईचा वापर तसेच मंद आचेवर ती तयार केली जात असल्याने त्याला स्वाद वेगळा आहे.

Ratnadeep Dairy | agrowon

राइस प्लेटवर स्विट

जयसिंगपूर शहरामधील अनेक हॉटेल्समधूनही ‘राइस प्‍लेट’ सोबत ‘स्वीट’ म्हणून ही रत्नदिप बासुंदी दिली जाते.

Ratnadeep Dairy | agrowon

तुपाचे वेगळेपण

मादनाईक यांच्याकडील गायीच्या व म्हशीच्या तुपाचाही खास ग्राहक वर्ग आहे. अगदी मुंबईपर्यंत हे तूप पोहोचले आहे.

Ratnadeep Dairy | agrowon

विक्री व्यवस्थेचे नियोजन

मादनाईक कुटुंब अनेक वर्षांपासून या व्यवसायात असल्याने उन्‍हाळ्यामध्ये दूध, दही, ताक याची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

Ratnadeep Dairy | agrowon

२०० किलोपर्यंत बासुंदी विक्री

वर्षभराचा एकूण अंदाज घेता दररोज २५ किलोपासून ते २०० किलोपर्यंत बासुंदीची विक्री होते. यासह अनेक गोड पदार्थांना मोठी मागणी असते.

Ratnadeep Dairy | agrowon

परंपरा जपली

दुग्धालयाच्या व्यवस्थापनात प्रवीण यांना वडील कुबेर तसेच संगणक क्षेत्रात बीई झालेल्या पत्नी स्नेहा यांची मोठी मदत होते.

Ratnadeep Dairy | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.