sandeep Shirguppe
उन्हाळ्यात अनेक लोक गार वाटण्यासाठी बर्फ खातात तर वारंवार थंड पेय पितात पॅगोफेजिया असे म्हणतात.
डॉक्टरांच्या मतानुसार शरीरात लोहाची कमतरता असल्यानं अॅनिमिया होतो. यामुळेदेखील बर्फ खाण्याची इच्छा वाढू शकते.
एका अभ्यासातून असं समोर आलं की, आपल्या मुलाच्या अभ्यासाच्या तणावामुळे ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमुळेही हे होतं.
शरीरात पोषक तत्वे कमी असतील तर बर्फ खाण्याची इच्छा होते. परंतु यामुळे आपल्या शरिराला नुकसान वाटतं.
बर्फ चाखल्यानं शरीराला थंड वाटतं आणि तहान मिटते. तसंच कोरडे पडलेले ओठ ओले होतात. परंतु दातांना इजा होण्याची शक्यता असते.
बर्फ खाण्याच्या सवयीने अनेक समस्या उद्भवू शकतात. तसंच यामुळे काही आजारांना निमंत्रणही मिळण्याची शक्यता असते.