Swarali Pawar
अमेरिकन लष्करी अळी कमी वेळात मक्याचे मोठे नुकसान करू शकते. वेळीच निरीक्षण करून योग्य उपाय केल्यास पिकाचे नुकसान कमी करता येते.
सुरुवातीला पानांवर पांढरे चट्टे आणि नंतर छिद्रे दिसू लागतात. पोंग्यात एका रेषेत छिद्रे आणि लाकडाच्या भुशासारखी विष्ठा दिसणे हे प्रमुख लक्षण आहे.
पानांच्या खाली अंडी पुंज किंवा लहान अळ्या दिसल्यास त्या गोळा करून नष्ट करा. नियमित पाहणी केल्यास प्रादुर्भाव सुरुवातीलाच रोखण्यास मदत होते.
शेतात एकरी १० पक्षिथांबे आणि पतंगांच्या निरीक्षणासाठी ५ कामगंध सापळे लावा.
नियंत्रणासाठी गरजेनुसार एकरी १५ कामगंध सापळेही वापरता येतात.
मेटारायझियम रिलाई किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली १.१५ टक्केची फवारणी करता येते.
यासाठी ५० ग्रॅम जैविक बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
५ टक्के झाडांवर प्रादुर्भाव दिसल्यास रासायनिक नियंत्रणाचा विचार करता येतो.
मध्य पोंगा अवस्थेत ५ ते १० टक्के झाडांवर प्रादुर्भाव असल्यासही फवारणी आवश्यक ठरू शकते.
लष्करी अळी पोंग्यात लपून बसत असल्याने फवारणी तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
शिफारशीनुसार योग्य कीटकनाशकाची मात्रा वापरून पोंग्यावर व्यवस्थित फवारणी करा.
पुढील फवारणीची गरज असल्यास वेगळ्या कार्यगटातील कीटकनाशक वापरा.
चारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्यावर या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नका.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.