Chara Niyojan: कमी पाऊस पडणार? चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी आत्तापासून करा नियोजन!

Swarali Pawar

चाऱ्याची चिंता नको, नियोजन करा!

कमी पावसामुळे हिरवा चारा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ३० ते ६० दिवसांचा चारा साठा आत्तापासून तयार ठेवा.

Fodder Planning | Agrowon

चारा जपून ठेवा

सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, ऊस आणि तूर यांचे अवशेष चाऱ्यासाठी वापरा. तुरीचा कडबा आणि इतर कडबा योग्य पद्धतीने वाळवून साठवून ठेवा.

Fodder Planning | Agrowon

रब्बीत चारा पिकांचे नियोजन

ज्वारी, मका आणि ओट यांसारखी चारा पिके रब्बीत घेता येतात. नेपियर, लसणघास आणि बरसीमसारख्या बहुकापणीच्या चारा पिकांचाही विचार करा.

Fodder Planning | Agrowon

जनावराला रोज किती चारा?

दुभत्या गायीला १५ ते २० किलो हिरवा आणि ४ ते ५ किलो सुका चारा द्या. म्हशीला २० ते २५ किलो हिरवा आणि ५ ते ६ किलो सुका चारा द्यावा.

Fodder Planning | Agrowon

मुरघास करून ठेवा

मका, ज्वारी आणि बाजरीपासून मुरघास तयार करून दीर्घकाळ साठवता येतो. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आणि तुरीचा कडबाही सावलीत वाळवून ठेवा.

Fodder Planning | Agrowon

चारा वाया जाऊ देऊ नका!

जनावरांसमोर चारा नुसता टाकल्यास १५ ते २० टक्के चारा वाया जाऊ शकतो. त्यामुळे हिरवा आणि सुका चारा कुट्टी करून गव्हाणीत दिल्यास अपव्यय कमी होतो.

Fodder Planning | Agrowon

चारा कमी पडला तर?

खनिज मिश्रण, मिठाच्या वड्या आणि पूरक खाद्याचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करता येतो. सुबाभूळ, शेवगा, गिरीपुष्प आणि बाभळीचा पाला चाऱ्यासोबत देता येतो.

Fodder Planning | Agrowon

गावातच चारा बँक!

शेतकरी गट, दूध संस्था किंवा बचत गटांनी एकत्र येऊन चारा साठवला तर टंचाईच्या काळात मदत होते. सामूहिक खरेदीमुळे कडबा आणि पशुखाद्याचा खर्चही कमी करता येतो.

Fodder Planning | Agrowon

Soybean Yellow Mosaic: सोयाबीन पिवळे पडतेय? पिवळा मोझॅक रोखण्यासाठी करा हे उपाय!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...