Mahesh Gaikwad
बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर डोंगररांगा यामुळे हे ठिकाण उन्हाळ्यात फिरण्यासाठी आवडीचे डेस्टिनेशन असते. मनमोहक निसर्ग सौंदर्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे स्वर्गाहून कमी नाही.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले महाबळेश्वर हे भारतातील सर्वात प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. येथील स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल, विविध हिल पॉइंट्स आणि शांत वातावरण यामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
उटी हे निलगिरी पर्वताच्या कुशीत वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच येथील बॉटॅनिकल गार्डन्स, टॉय ट्रेनसाठीही ऊटी प्रसि्ध्द आहे.
भारतातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी कुर्ग हे एक आहे.. याला दक्षिणेचे स्कॉटलंड म्हणूनही ओळखतात. कुर्ग हे कॉफीचे मळे, धबधबे, आणि हिरव्यागार हिरवळीच्या लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे.
दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. चहा बागा, टॉय ट्रेन, आणि कांचनजुंगा पर्वत यामुळे दार्जिलिंग तुम्हाला वेगळ्या दुनियेत घेऊन जाते.
हिमाचल प्रदेशातील शिमला हे सुध्दा उन्हाळ्यात फिरण्यासाठी अतिशय बेस्ट ठिकाण आहे. शिमला हे ब्रिटीशकालीन वास्तू आणि थंड हवामानामुळे भारतातील लोकप्रिय समर डेस्टिनेशन आहे.
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. दिलवाडा जैन मंदिरे, नक्की लेक आणि थंडगार वातावरण यामुळे ते एक परफेक्ट समर डेस्टिनेशन आहे.
लडाख हे पर्वतीय सौंदर्यासाठी आणि तेथील बौध्द मठांसाठी प्रसिध्द आहे. लेह ते लडाख हा रस्तामार्ग टू-व्हिलर रायडर्ससाठी अॅड्व्हेचरसाठी प्रसिध्द आहे .
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.