Summer Hydration Fruit : उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी कोणती फळे खावीत?

Mahesh Gaikwad

कलिंगड

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेच्या तीव्रतेपासून बचावासाठी कलिंगड खावे. कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवते.

Summer Hydration Fruit | Agrowon

खरबूज

उन्हाळ्याच्या दिवसांत खरबूज खाणेही फायदेशीर असते. खरबूजामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Summer Hydration Fruit | Agrowon

संत्री

उन्हाळ्यामध्ये जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी संत्री जरूर खावीत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

Summer Hydration Fruit | Agrowon

आंबा

उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळांपैकी आंबा हा एक असून तो अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. या दिवसांत आंबा खाल्लाने शरीराला ऊर्जा मिळते.

Summer Hydration Fruit | Agrowon

लिंबू

उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबूपाणी पिणे फायदेशीर असते. लिंबूपाणी पिण्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते. तसेच उष्णतेच्या तीव्रतेपासून नैसर्गिक संरक्षण मिळते.

Summer Hydration Fruit | Agrowon

पपई

उन्हाळ्यात पपईचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ती पचनासाठी उपयुक्त असते.

Summer Hydration Fruit | Agrowon

नारळ

नारळाचे पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा उत्तम स्रोत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवण्यास यामुळे मदत होते आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

Summer Hydration Fruit | Agrowon

डाळिंब

डाळिंब खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसातील अशक्तपणा व थकवा यामुळे कमी होतो.

Summer Hydration Fruit | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....