Swarali Pawar
शेंगा पूर्ण वाळण्याची वाट पाहू नका, योग्य वेळी काढणी करणं महत्त्वाचं आहे. काढणी, मळणी आणि साठवणीत थोडी काळजी घेतली तर दाण्यांची गुणवत्ता टिकवता येते.
मूग आणि उडदाच्या जवळपास ७५ टक्के शेंगा वाळल्यावर पहिली तोडणी करा. मूगाच्या शेंगा काळपट किंवा तपकिरी होऊन वाळू लागल्या की काढणी सुरू करा.
सकाळच्या वेळी शेंगांमध्ये आणि वातावरणात ओलावा असल्याने शेंगा फुटण्याचं प्रमाण कमी राहतं. पहिल्या तोडणीनंतर ८ ते १० दिवसांनी उरलेल्या शेंगांची तोडणी करा.
तोडलेल्या शेंगा खळ्यावर पसरवून चांगल्या वाळवून घ्या. परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन काढणी करा आणि कापलेलं पीक उघड्यावर ठेवू नका.
हार्वेस्टरच्या मदतीने उडदाची मळणी कमी वेळात करता येते. मळणी करताना यंत्राचा वेग साधारण ३०० ते ३५० आरपीएम ठेवावा.
हार्वेस्टरचा वेग जास्त असल्यास उडदाचे दाणे फुटण्याची किंवा तडकण्याची शक्यता असते. त्यामुळे मळणीपूर्वी यंत्राचा वेग योग्य आहे का, हे नक्की तपासा.
दाण्यांमधील काडीकचरा, फुटलेले दाणे आणि इतर अशुद्धी वेगळ्या करून घ्या. त्यानंतर दाणे चांगले वाळवूनच साठवणुकीसाठी ठेवा.
दाण्यांमध्ये ओलावा राहिल्यास बुरशी आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे दाणे पूर्ण कोरडे करून कोरड्या ठिकाणी साठवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.