Livestock Diary: जनावरांची डायरी ठेवा! नोंदीतून वाढवा उत्पादन आणि नफा

Team Agrowon

डायरी का ठेवायची?

प्रत्येक जनावराची दूध, प्रजनन आणि आरोग्याची माहिती लिहून ठेवली तर व्यवस्थापन सोपं होतं. यामुळे चांगली जनावरं ओळखून उत्पादन आणि नफा वाढवण्यास मदत होते.

Livestock Diary | Agrowon

प्रत्येक जनावराची ओळख

जनावराचा क्रमांक, जात, जन्मतारीख, लिंग आणि आई-वडिलांची माहिती लिहा. यामुळे प्रत्येक जनावराची स्वतंत्र कामगिरी समजून घेता येते.

Livestock Diary | Agrowon

दूध उत्पादनाची नोंद

दररोजचे दूध, दुग्धकालावधी, सर्वाधिक दूध उत्पादन आणि फॅटची नोंद करा. यामुळे कोणते जनावर जास्त उत्पादन देतं हे सहज समजतं.

Livestock Diary | Agrowon

प्रजननाची माहिती

पहिल्या वेताचे वय, दोन वेतांमधील अंतर आणि गर्भधारणेसाठी लागलेल्या सेवांची नोंद ठेवा. या नोंदींमुळे प्रजननासाठी योग्य जनावरांची निवड करता येते.

Livestock Diary | Agrowon

आरोग्याची नोंद

जनावराचे वजन, आजार, उपचार, लसीकरण आणि जंतनिर्मूलनाची माहिती लिहून ठेवा. यामुळे आजारांची पुनरावृत्ती आणि पुढील उपचारांचे नियोजन करणे सोपे जाते.

Livestock Diary | Agrowon

आहाराचे नियोजन

नोंदी पाहून कोणत्या जनावराला किती चारा आणि खाद्य द्यायचे हे ठरवता येते. दूध अचानक कमी झाल्यास आरोग्याची समस्या आहे का, हेही लवकर लक्षात येते.

Livestock Diary | Agrowon

फायदेशीर जनावर

जनावरावर होणारा चारा आणि इतर खर्च तसेच त्यातून मिळणाऱ्या दूधाचे उत्पन्न यांची तुलना करा. यामुळे कोणते जनावर फायदेशीर आहे आणि कुठे खर्च कमी करायचा हे समजते

Livestock Diary | Agrowon

डिजिटल डायरी शक्य!

नोंदी वहीत किंवा मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपातही ठेवता येतात. फक्त नोंदी नियमित आणि अचूक ठेवा, कारण योग्य नोंदींवरच चांगले निर्णय घेता येतात.

Livestock Diary | Agrowon

Powdery Mildew: मूग-उडिदावरील भुरी रोगासाठी कोणती फवारणी उपयुक्त

Agrowon
अधिक माहितीसाठी...