Mahesh Gaikwad
आजकाल निरोगी आणि तंदुरूस्त आरोग्यासाठी अनेकजण जीममध्ये घाम गाळतात. पण केवळ व्यायामाच नाही तर शरीराला योग्य आहाराचीही गरज असते.
निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
संतुलित आहारामध्ये पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटामिन, मिनरल्स, पोषण तत्त्व आणि प्रोटीन यांचा समावेश होतो.
शरीराची प्रोटीनची गरज भरून काढण्यासाठी रोज एक अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतू शाकाहारी लोकांसाठी हा सल्ला उपयोगाचा नसतो.
अंड्याचे नाव घेताच शाकाहारी लोक नाक मुरडतात. मग शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा स्त्रोत काय असाही प्रश्न पडतो.
तर मूगाची डाळ शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा बेस्ट स्त्रोत आहे. अंड्याच्या पांढऱ्या भागात जवळपास ३ टक्के प्रोटीन असते.
अंड्याच्या तुलनेत १०० ग्रॅम मुगाच्या डाळीमध्ये सुमारे २४ ग्रॅम इतके प्रोटीन असते.
मुगाच्या डाळीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पचनक्रिया सुधारते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.