Moong Dal Benefits: मूग डाळ आहे आरोग्याचा खजिना; ७ जबरदस्त फायदे

Deepak Bhandigare

आरोग्यासाठी लाभदायक

डाळींचे अनेक प्रकार असून, जसे की हरभरा डाळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ. प्रत्येक डाळीचे स्वतःचे असे पौष्टिक महत्त्व असले तरी मूग डाळ ही आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानली जाते

Moong Dal Benefits | Agrowon

बद्धकोष्ठता

मूग डाळ ही पचण्यास हलकी असते, यामुळे आहारात तिचा समावेश केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासाठी मूग डाळीची खिचडी बनवून खावी

Moong Dal Benefits | Agrowon

रक्तदाब नियंत्रणात

मूग डाळीत असलेले मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना आहारात या डाळीचा समावेश करण्यास सांगितले जाते

Moong Dal Benefits | Agrowon

पचनक्रिया

मूग डाळीत भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास तसेच अपचन आणि पोटातील जळजळ कमी करण्यासही मदत करते

Moong Dal Benefits | Agrowon

कॅल्शियम

मूग डाळीत कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे तिचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत आणि निरोगी राहतात

Moong Dal Benefits | Agrowon

डोळे निरोगी

मूग डाळीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-५ आणि व्हिटॅमिन बी-६ यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे आढळतात, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जातात

Moong Dal Benefits | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

मूग डाळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. या डाळीचा रोजच्या आहारात समावेश केल्याने सुरकुत्या, डाग आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या कमी होण्यास मदत होते

Moong Dal Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉल

एका संशोधनानुसार, खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याची क्षमता असल्यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी मूग डाळीचा आहारात वापर करायला हवा

Moong Dal Benefits | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dal Benefits | Agrowon
Tur Dal Benefits: तूरडाळीचा आहारात समावेश का करावा?