Deepak Bhandigare
तूरडाळीत पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असल्याने ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानली जाते
तूरडाळीत भरपूर प्रमाणात प्रथिने आढळतात. विशेषतः जे लोक शाकाहारी आहेत; त्यांनी प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी आहारात या डाळीचा आवर्जून समावेश करावा
तूरडाळीत अनेक मिनरल्स असतात, जे हाडे मजबूत ठेवणे, पचनसंस्था निरोगी राखण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात
तूरडाळीत प्रथिनांसोबतच फायबरही भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि यामुळे अति खाणे टाळून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
तूरडाळीमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. जर तुम्हाला सहज पचणारी डाळ हवी असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे
तूरडाळीचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानले जाते, त्यात पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहून हृदय निरोगी राखण्यास मदत होते
तूरडाळीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते, तसेच सर्दी, ताप यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठीही ती उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले जाते
तूरडाळीत कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, सेलेनियम, झिंक आणि मॅंगनीज यासारखी अनेक पोषक तत्त्वे असतात, हे सर्व व्हिटॅमिन आणि मिनरल्स शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात