Drought : शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घ्या साहेब...

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

‘‘पिकांची १ लाख १८ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम होती अग्रिम २५ दिला म्हणतात. खात्यावर ६ हजार आले.

Drought Situation | Agrowon

आता तुम्हीच सांगा कोणत्या हिशेबाने २५ टक्के दिले म्हणावे. ७२ तासांत तक्रार करा म्हणतात, कशी कराव, साधनच नाही, कळतही नाही. कापसाचा उतारा कुंटल दोन कुंटल आलाय.

Drought Situation | Agrowon

त्यात आमचं पुढचं कसं भागान. येचनी जिथं सात रुपये किलो होती, ती आता १४ रुपये किलो झाली. बाई जिथं कुंटल दोन कुंटल कापूस वेचायची ती आता फक्त ३०-३५ किलो वेचू शकते,

Drought Situation | Agrowon

तिचा दोष नाही, कापूस भिजलाय. तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत भलंच नाही, चुकलं असेल तर माफ करा साहेब, पण आमची व्यथा समजून घ्या.’’

Drought Situation | Agrowon

ताड हदगाव येथील अनिल दिवटे यांच्या मोसंबी बागेत पथक पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी पाण्याची दैना किती गंभीर आहे. याचे वर्णन केले.

yandex

एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. शासन आणि प्रशासनात याबाबत समन्वयाचा अभाव आहे.

Drought Conditions | yandex

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा