kadaknath Chicken Facts : कडकनाथ कोंबडी अनेक आजरांमध्ये आहे गुणकारी

Mahesh Gaikwad

कडकनाथ कोंबडी

कडकनाथ कोंबडी ही तिच्या काळ्या रंगासाठी आणि काळ्या मांसासाठी प्रसिध्द आहे. परंतु या कोंबडीचे मांस, अंडी मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

kadaknath Chicken Facts | Agrowon

कोंबडीची दुर्मिळ प्रजाती

कडकनाथ ही कोंबड्यांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. ही कोंबडी प्रामुख्याने मध्यप्रदेशातील झाबुआ आणि अलिराजपूर या भागात आढळते.

kadaknath Chicken Facts | Agrowon

मूळनाव काळामाशी

या कोंबडीचे मूळ नाव काळामाशी असे आहे. या कोंबडीच्या मांस, अंड्यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असल्याने याचे मानवी आरोग्यासाठी फायदे आहेत.

kadaknath Chicken Facts | Agrowon

काळ्या रंगाची कोंबडी

मेलानिन रंगद्रव्यामुळे या कोंबडीचा रंग काळा असतो. यामुळे या कोंबडीचे मांस, त्वचा आणि रक्तही काळेच असते.

kadaknath Chicken Facts | Agrowon

२५ टक्के अधिक प्रोटीन

इतर कोंबड्यांच्या तुलनेत कडकनाथमध्ये २५ टक्के अधिक प्रोटीन असते. तसेच यामध्ये व्हिटामिन-सी, ई, बी-१, बी-२, बी-६, कॅल्शिअम आणि लोह घटक असतात.

kadaknath Chicken Facts | Agrowon

औषधासाठी वापर

या कोंबडीच्या रक्ताचा वापर ब्लड प्रेशरपासून ह्रदय रोगाशी संबंधित आजारांवरील औषधे तयार करण्यासाठी केला जातो.

kadaknath Chicken Facts | Agrowon

कडनाथ कोंबडीचे मांस

तसेच या कोंबडीचे मांस अनेक आजार बरे करण्यासाठी मदत करते. ही कोंबडी वर्षाला सरासरी ८० अंडी देते.

kadaknath Chicken Facts | Agrowon

कडकनाथ कोंबडी महाग

या कोंबडीची अंडी महाग असतात. कडकनाथ जातीची कोंबडी ब्रॉयलर कोंबडीच्या तुलनेत तीन ते पाच पट महाग असते.

kadaknath Chicken Facts | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

kadaknath Chicken Facts | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....