Mahesh Gaikwad
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. या व्यवसायात अनेक शेतकरी कडकनाथ कोंबड्या पाळतात.
कडकनाथ ही कोंबड्यांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. गेल्या काही वर्षांत या प्रजातीची कोंबडीपालनासाठी मागणी वाढली आहे.
कडकनाथ कोंबडी प्रामुख्याने मध्य प्रदेशातील झाबुआ आणि अलिराजपूर येथे आढळते. स्थानिक भाषेत हिला 'काळामाशी' असे म्हणतात.
या कोंबडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वे असल्याने मागणी जास्त आहे. पण या कोंबडीचा रंग एवढा काळा का असतो? असा प्रश्न अनेकांना पडतो.
या कोंबडीचा रंग काळा असण्याचे प्रमुख कारण म्हणजे मेलानिन रंगद्रव्य. यामुळे या कोंबडीचे मांस, त्वचा, रक्त काळे असते.
मेलानिन व्यतिरिक्त या कोंबडीमध्ये लोहाचे (आयर्न) प्रमाण अधिक असते. त्यामुळेही हिचा रंग काळा असतो. मेलानिन आणि लोहामुळे या कोंबडीचा रंग गडद काळा असतो.
जगभरात काळ्या कोंबड्यांच्या तीन जाती पाहायला मिळतात. यापैकी कडकनाथ ही एक आहे. इतर दोन जाती या चीन आणि इंडोनेशियामध्ये आढळतात.
भारतीय वातावरणात जुळवून घेण्याची क्षमता कडकनाथ कोंबडीमध्ये आहे. या कोंबड्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिजैविके दिली जात नसल्याने यांचे मांस खाण्यासाठी सुरक्षित आहे.
इतर कोंबड्यांच्या तुलनेत कडकनाथ कोंबडीमध्ये २५ टक्के अधिक प्रोटीन असते. यामध्ये व्हिटामिन सी, इ, बी१, बी२, बी६, बी१२, कॅल्शिअम आणि लोह हे घटक आढळतात.