Guava Pickle : तोंडात पाणी आणणारे पेरूचे आंबट-गोड लोणचे; एकदा चव चाखली तर नेहमीच बनवाल

Anuradha Vipat

पेरूचे लोणचे

नेहमीची तीच तीच लोणची खाऊन कंटाळा आला असेल, तर तोंडाची चव बदलण्यासाठी पेरूचे हे झटपट लोणचे एक उत्तम पर्याय आहे.

Guava Pickle | agrowon

आंबट-गोड-तिखट

केवळ १० मिनिटांत तयार होणारे हे आंबट-गोड-तिखट लोणचे जेवणाची लज्जत वाढवते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते.

Guava Pickle | agrowon

साहित्य

मध्यम पिकलेले पेरू,मोहरी किंवा तेल,राई,हिंग,हळद,लाल तिखट,भाजलेली जिरे पावडर,चाट मसाला किंवा काळे मीठ,साधे मीठ,पिठी साखर किंवा गूळ पावडर,लिंबाचा रस.

Guava Pickle | agrowon

कृती

पेरूच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. १-२ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात राई आणि हिंग टाकून फोडणी तडतडवून घ्या.

Guava Pickle | agrowon

मसाले मिक्स करणे

एका मोठ्या बाऊलमध्ये पेरूच्या फोडी काढा. त्यावर हळद, लाल तिखट, जिरे पावडर, चाट मसाला, काळे मीठ, साधे मीठ आणि पिठी साखर घाला.

Guava Pickle | agrowon

फोडणी ओतणे

तयार केलेली कोमट फोडणी या मसाल्यांवर आणि पेरूच्या फोडींवर ओता. शेवटी यामध्ये लिंबाचा रस घाला आणि चमच्याने सर्व मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करा.

Guava Pickle | agrowon

लोणचे तयार

तुमचे चटपटीत, तोंडाला पाणी आणणारे पेरूचे झटपट लोणचे खाण्यासाठी अगदी तयार आहे!

Guava Pickle | agrowon

Aluminum Cookware : सावधान! ॲल्युमिनियमच्या भांड्यात चुकूनही शिजवू नका 'या' भाज्या; वाढेल आजारांचा धोका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aluminum Utensils Benefit | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...