Aluminum Cookware : सावधान! ॲल्युमिनियमच्या भांड्यात चुकूनही शिजवू नका 'या' भाज्या; वाढेल आजारांचा धोका

Anuradha Vipat

अत्यंत घातक

ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये ठराविक प्रकारच्या भाज्या किंवा अन्नपदार्थ शिजवणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Aluminum Cookware | agrowon

रासायनिक प्रक्रिया

ॲल्युमिनियम हा एक अत्यंत क्रियाशील धातू आहे. जेव्हा आपण यामध्ये विशिष्ट गुणधर्म असलेल्या भाज्या शिजवतो, तेव्हा रासायनिक प्रक्रिया होऊन ॲल्युमिनियम अन्नात विरघळतो.

Aluminum Cookware | agrowon

गंभीर आजार

हे अन्न शरीरात गेल्याने पोटाचे विकार, यकृत आणि किडनीचे आजार, तसेच अल्झायमर सारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

Aluminum Cookware | agrowon

ॲसिड किंवा आंबटपणा

ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिक ॲसिड किंवा आंबटपणा असतो, त्या जरमनच्या भांड्यासोबत लगेच रासायनिक प्रक्रिया करतात. उदा.टोमॅटो किंवा टोमॅटोची प्युरी, आंबट चुका किंवा अंबाडीची भाजी, कैरी, चिंच किंवा कोकम घातलेल्या भाज्या.

Aluminum Cookware | agrowon

लिंबू किंवा दही वापरल्या जाणाऱ्या भाज्या

जर तुम्ही एखाद्या भाजीमध्ये शेवटी लिंबाचा रस पिळणार असाल किंवा भाजी तयार करताना दही अथवा ताकाचा वापर करणार असाल तर ती जरमनच्या भांड्यात बनवू नका.

Aluminum Cookware | agrowon

पालक आणि मेथी

पालकामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. जरमनच्या भांड्यात पालक शिजवल्याने भाजीचा रंग तर बदलतोच, शिवाय ती आरोग्यासाठी हानिकारक बनते.

Aluminum Cookware | agrowon

मासे आणि नॉन-व्हेज रस्सा

माशांचे सार किंवा तिखट रस्सा बनवताना भरपूर प्रमाणात टोमॅटो, चिंच किंवा कोकम वापरले जाते. त्यामुळे नॉन-व्हेज पदार्थ जरमनच्या भांड्यात शिजवणे पूर्णपणे टाळावे.

Aluminum Cookware | Agrowon

Oil Free Lemon Pickle : बिना तेलाचे लिंबाचे चटपटीत गोड लोणचे: पचनासाठी उत्तम आणि चवीला एकदम भारी

Oil Free Lemon Pickle | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...