Team Agrowon
हिवाळ्यामध्ये जर तापमान खूपच कमी झाले तर कोंबड्या थंडीच्या कडाक्याने मृत्यूमुखी पडतात. तापमानातील बदल लक्षात घेऊन कोंबड्यांच्या व्यवस्थापन बदल करावेत.
कोंबड्यांचे अती थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या लांबीच्या बाजूने असलेल्या जाळीस स्वच्छ व कोरडे पडदे लावावेत.
पडद्यांची उघडझाप सहज करता यावी आणि पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.
शेडमध्ये योग्य वायुवीजन व खेळती हवा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी ज्या वेळेस शक्य आहे, अशा वेळेस पडद्यांची उघड-झाप वरून खाली करावी. तसे केल्यास कार्बन डायऑक्साइडयुक्त दूषित हवा पटकन बाहेर फेकली जाते.
दूषित हवा बाहेर न टाकल्यास आणि कोंबड्यांना ऑक्सिजनयुक्त (स्वच्छ) हवा उपलब्ध न झाल्यास त्यांना हायपोक्षीया (ऑक्सिजनची कमतरता) होतो. जलोदर सारखे चयापचयाचे आजार होतात, मरतूक वाढते.
शेडची रचना ही पूर्व-पश्चिम असावी. रुंदी ३० फुटांपेक्षा जास्त नसावी. शेडची रुंदी जास्त असल्यास शेडमधील हवा खेळती राहणार नाही.
हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात योग्य बदल करावेत. हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात.
Stubble Burning : शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष जाळाल तर दंड भराल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.