Stubble Burning : शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष जाळाल तर दंड भराल

Team Agrowon

पऱ्हाटीसह पिकाचे अवशेष जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने चिंता वाढली आहे. या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पर्यावरण मंत्रालयाकडून नुकतीच एक अधिसूचना काढण्यात आली आहे.

Stubble Burning | Agrowon

पऱ्हाटी तसेच पिकांचे अवशेष जाळणाऱ्यांकडून यापुढे पाच ते तीस हजार रुपयांचा दंड अंगीकारला जाणार आहे.

Stubble Burning | Agrowon

दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान सरकार या नियमांची अंमलबजावणी करण्यास बांधील असतील.

Stubble Burning | Agrowon

खरीप हंगामानंतर पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये पिकांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर जाळले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊन प्रदूषणात वाढ होते.

Stubble Burning | Agrowon

देशाची राजधानी दिल्लीसह अनेक भागांतील नागरिकांना श्‍वसनासंबंधी त्रासाचा सामना करावा लागतो. दर वर्षी ही परिस्थिती निर्माण होते.

Stubble Burning | Agrowon

आतापर्यंत राज्यातील सुमारे १५० शेतकऱ्यांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यातील २९ जणांना अटक करून ३८० जणांना रेडलिस्ट करण्यात आले आहे.

Stubble Burning | Agrowon

पंजाब सरकारने १०.५५ लाख रुपयांचा दंड आजवर वसूल केला असून ३९४ शेतकऱ्यांच्या महसूल नोंदी रेड लिस्टेड करण्यात आल्या आहेत.

Stubble Burning | Agrowon

दोन एकरांपेक्षा कमी जमीन क्षेत्रासाठी पाच हजार रुपये, तर दोन ते पाच एकर जमीन असणाऱ्यांकडून दहा हजार रुपये दंडाची आकारणी होईल.

Stubble Burning | Agrowon

पाच एकरांपेक्षा अधिक जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांकडून तीस हजार रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे.

Stubble Burning | Agrowon

Mango Export : लाडक्या हापूस, केसर आंब्याची निर्यात का वाढत नाही?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा....