Soybean Yellow Mosaic: सोयाबीन पिवळे पडतेय? पिवळा मोझॅक रोखण्यासाठी करा हे उपाय!

Swarali Pawar

सोयाबीन पिवळे पडतेय?

पानांवर हिरव्या-पिवळ्या रंगाचे पट्टे दिसत असतील तर पिवळा मोझॅकचा धोका असू शकतो. वेळीच रोग ओळखून उपाय केल्यास उत्पादनातील नुकसान कमी करता येते.

Control Yellow Mosaic | Agrowon

पिवळा मोझॅकची लक्षणे

शेंड्याकडील पाने पिवळी पडून लहान होतात आणि पानांवर हिरवे-पिवळे भाग दिसतात. पेरणीनंतर साधारण २५ ते ३० दिवसांनी ही लक्षणे दिसू शकतात.

Control Yellow Mosaic | Agrowon

रोगामुळे काय नुकसान

रोगामुळे पानांतील हरितद्रव्य कमी होऊन अन्ननिर्मितीवर परिणाम होतो. झाडांची वाढ खुंटते, शेंगा लहान राहतात आणि दाण्यांची संख्या कमी होऊ शकते

Control Yellow Mosaic | Agrowon

पांढरी माशीवर लक्ष

पिवळा मोझॅक विषाणूचा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशीमुळे होतो. त्यामुळे रोग नियंत्रणासाठी पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.

Control Yellow Mosaic | Agrowon

पेरणी वेळेत करा

सोयाबीनची पेरणी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करा. वेळेवर पेरणी केल्यास पिकावरील रोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.

Control Yellow Mosaic | Agrowon

तण नियंत्रण आणि निंबोळी अर्क

शेतातील आणि बांधावरील तण वेळेवर काढून टाका. पेरणीनंतर २० ते ३५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करा.

Control Yellow Mosaic | Agrowon

रोगग्रस्त झाडे त्वरित काढा

पिवळा मोझॅकची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करा. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी २२ ते २३ पिवळे चिकट सापळे लावा.

Control Yellow Mosaic | Agrowon

किडींचा प्रादुर्भाव वाढला तर?

पांढरी माशी जास्त असल्यास शिफारशीनुसार संयुक्त कीटकनाशकांची फवारणी करता येते. फवारणीपूर्वी पिकाची अवस्था आणि औषधाचे लेबल क्लेम तपासून तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Control Yellow Mosaic | Agrowon

Maize Spraying: मक्याची वाढ खुंटलीय? खतांचे योग्य नियोजन करून पीक जोमदार करा!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...