Antravishar Rog: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषार रोगाचा धोका! कसा करावा प्रतिबंध

Swarali Pawar

जीवघेण्या आजाराचा धोका!

पावसाळ्यातील कोवळे गवत शेळ्या-मेंढ्यांना आवडते. पण याच काळात आंत्रविषाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Prevention of Antravishar | Agrowon

कोणत्या जनावरांना धोका?

आंत्रविषार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. मात्र करडे आणि कोकरे यांना याचा सर्वाधिक धोका असतो.

Prevention of Antravishar | Agrowon

आजाराची प्रमुख कारणे

कोवळे गवत जास्त खाणे, जास्त दूध पाजणे आणि आहारात अचानक बदल करणे. तसेच मका, ज्वारी, गहू जास्त दिल्यासही धोका वाढतो.

Prevention of Antravishar | Agrowon

करडांमध्ये लक्षणे

करडे सुस्त होतात आणि दूध पिणे बंद करतात. हिरवट जुलाब, तोंडाला फेस आणि चक्कर अशी लक्षणे दिसू शकतात.

Prevention of Antravishar | Agrowon

मोठ्या शेळ्या-मेंढ्यांमध्ये?

तोंडाला फेस, अडखळत चालणे, तोल जाणे आणि पोट फुगणे. श्वास घेण्यास त्रास आणि जुलाबही दिसू शकतात.

Prevention of Antravishar | Agrowon

वेळीच उपचार करा

या आजारात करडांचा अवघ्या १२ तासांत मृत्यू होऊ शकतो. लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्या.

Prevention of Antravishar | Agrowon

लसीकरण प्रभावी उपाय

आंत्रविषारापासून बचावासाठी ईटीव्ही (ETV) लस नियमित द्या. तीन महिन्यांवरील करडे, कोकरे आणि गाभण जनावरांचेही लसीकरण करा.

Prevention of Antravishar | Agrowon

ही काळजी नक्की घ्या

कोवळे गवत किंवा कर्बोदकयुक्त खाद्य एकदम जास्त देऊ नका. अचानक मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करून उर्वरित कळपाचे त्वरित लसीकरण करा.

Prevention of Antravishar | Agrowon

Bacterial Wilt In Tomato: टोमॅटोतील जिवाणूजन्य मर रोग! लक्षणे ओळखा, वेळीच करा उपाय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...