Bacterial Wilt In Tomato: टोमॅटोतील जिवाणूजन्य मर रोग! लक्षणे ओळखा, वेळीच करा उपाय

Swarali Pawar

टोमॅटो पीक अचानक वाळतेय?

पावसाळ्यात टोमॅटोमध्ये जिवाणूजन्य मर रोगाचा धोका वाढतो. वेळीच लक्षणे ओळखून उपाय केल्यास मोठे नुकसान टाळता येते.

Cure of Tomato Wilt | Agrowon

रोगाची सुरुवात कशी ओळखाल?

झाड हिरवेगार असतानाच दुपारच्या उन्हात कोमेजते. संध्याकाळी पुन्हा ताजे दिसते, पण काही दिवसांत पूर्ण वाळते.

Cure of Tomato Wilt | Agrowon

हा रोग कसा ओळखायचा?

खोड कापल्यावर आतील भाग तपकिरी दिसतो. खोड पाण्यात ठेवल्यास पांढऱ्या दोऱ्यासारखा चिकट द्राव बाहेर येतो.

Cure of Tomato Wilt | Agrowon

रोगाचा प्रसार कसा होतो?

जिवाणू मुळांद्वारे झाडात प्रवेश करतात. सिंचनाचे पाणी, अवजारे आणि जखमांमधूनही रोग पसरतो.

Cure of Tomato Wilt | Agrowon

प्रतिबंधासाठी काय कराल?

टोमॅटोची सलग लागवड टाळा आणि पिकांची फेरपालट करा. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

Cure of Tomato Wilt | Agrowon

लागवडीपूर्वी ही प्रक्रिया करा

रोपांची मुळे स्यूडोमोनास फ्लुरोसन्सच्या द्रावणात ३० मिनिटे बुडवा. शेणखतात ट्रायकोडर्मा मिसळून जमिनीत वापरा.

Cure of Tomato Wilt | Agrowon

रोग दिसताच उपाय करा

स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइडची बुंध्याजवळ आळवणी करा. यामुळे रोगाचा पुढील प्रसार कमी करण्यास मदत होते.

Cure of Tomato Wilt | Agrowon

रोगग्रस्त झाडे त्वरित काढा

रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून नष्ट करा. त्या जागी कॉपर ऑक्सिक्लोराईड द्रावण वापरा आणि शेतीची अवजारे स्वच्छ ठेवा.

Cure of Tomato Wilt | Agrowon

Food Inflation: एल निनोचा परिणाम! दूध, अंडी, चिकन महागले; डाळीही महागण्याची शक्यता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी..