Blackleg Disease: फऱ्या रोगाची लक्षणे आणि प्रतिबंध; प्रत्येक पशुपालकाने जाणून घ्यावेत

Swarali Pawar

पावसाळ्यातील लपलेला धोका!

पावसाळ्यात जनावरांमध्ये फऱ्या रोगाचा धोका वाढतो. वेळीच लक्षणे ओळखून काळजी घेतली तर मोठे नुकसान टाळता येते.

Black Quarter Disease | Agrowon

फऱ्या रोग कशामुळे होतो?

हा रोग जिवाणूमुळे होतो आणि त्याचे बीजाणू अनेक वर्षे जमिनीत राहू शकतात. ओलसर माती, चिखल किंवा चराईदरम्यान हे जिवाणू जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात.

Black Quarter Disease | Agrowon

कोणत्या जनावरांना जास्त धोका?

६ महिने ते २-३ वर्षे वयाच्या गायी, म्हशी आणि तरुण जनावरांना धोका जास्त असतो. पावसाळ्यात या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Black Quarter Disease | Agrowon

सुरुवातीची लक्षणे ओळखा

जनावराला अचानक ताप येतो आणि ते चारा-पाणी घेणे कमी किंवा बंद करते. यानंतर चालताना त्रास होतो आणि जनावर लंगडू लागते.

Black Quarter Disease | Agrowon

सूज दिसली तर सावध!

मांडी, खांदा किंवा पाठीच्या स्नायूंमध्ये गरम व वेदनादायक सूज दिसते. सूज दाबल्यावर चर्र-चर्र असा आवाज येणे हे फऱ्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे.

Black Quarter Disease | Agrowon

उपचारात उशीर करू नका

फऱ्या रोग खूप वेगाने वाढतो, त्यामुळे त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. वेळेत उपचार न मिळाल्यास काही तासांतच जनावर दगावण्याची शक्यता असते.

Black Quarter Disease | Agrowon

लसीकरणच सर्वात मोठे संरक्षण

पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर लस आणि बूस्टर डोस घेतल्यास रोगाचा धोका कमी होतो.

Black Quarter Disease | Agrowon

या सवयी ठेवा कायम

गोठा स्वच्छ व कोरडा ठेवा, जखमांवर त्वरित उपचार करा आणि चिखलात चराई टाळा. जारी जनावर वेगळे ठेवा आणि मृत जनावरांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा.

Black Quarter Disease | Agrowon

Monsoon Cattle Disease: घटसर्प रोग ओळखा! जनावरांचा जीव वाचवणाऱ्या 8 महत्त्वाच्या गोष्टी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...