Monsoon Cattle Disease: घटसर्प रोग ओळखा! जनावरांचा जीव वाचवणाऱ्या 8 महत्त्वाच्या गोष्टी

Swarali Pawar

घटसर्प म्हणजे काय?

पावसाळ्यात जनावरांमध्ये घटसर्प रोगाचा धोका वाढतो. वेळेत उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

Ghatsarp in Animals | Agrowon

रोग कसा पसरतो?

हा रोग जिवाणूमुळे होतो आणि नाक-तोंडातील स्राव, दूषित चारा, पाणी व आर्द्र वातावरणातून पसरतो.

Ghatsarp in Animals | Agrowon

कोणत्या जनावरांना जास्त धोका?

गाई, म्हशी, लहान वासरे तसेच शेळ्या-मेंढ्यांमध्ये या रोगाची लागण जास्त आढळते. वाढत्या वयातील जनावरे अधिक संवेदनशील असतात.

Ghatsarp in Animals | Agrowon

ही लक्षणे दिसताच सावध व्हा

तीव्र ताप, गळ्याला सूज, श्वास घेण्यास त्रास, नाकातून स्त्राव आणि खाणे-पिणे बंद होणे ही घटसर्पाची प्रमुख लक्षणे आहेत.

Ghatsarp in Animals | Agrowon

उपचारात उशीर करू नका

लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार केल्यास रोग नियंत्रणात येऊ शकतो.

Ghatsarp in Animals | Agrowon

लसीकरण हा सर्वोत्तम बचाव

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घटसर्पाची लस द्या. लहान वासरांचे वेळेवर लसीकरण आणि जंतनिर्मूलन करणेही आवश्यक आहे.

Ghatsarp in Animals | Agrowon

गोठ्यात स्वच्छता ठेवा

गोठा स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. जनावरांना स्वच्छ चारा-पाणी द्या आणि पावसाळ्यात दूषित पाणी पिणे टाळा.

Ghatsarp in Animals | Agrowon

बाधित जनावर वेगळे ठेवा

आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवा. त्यांचे खाद्य-पाणी स्वतंत्र ठेवून संक्रमित वस्तूंचे निर्जंतुकीकरण करा.

Ghatsarp in Animals | Agrowon

Perani Yantra: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2 फायदेशीर पेरणी यंत्रे!

अधिक माहितीसाठी...