Cucumber Cultivation: उन्हाळ्यात काकडीला मागणी; अशी करा लागवड!

Swarali Pawar

उन्हाळी काकडी

उन्हाळ्यात वेलवर्गीय पिकांना बाजारात चांगली मागणी असते. योग्य नियोजन केल्यास काकडीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

Summer Cucumber | Agrowon

लागवडीची वेळ आणि जमीन

उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारीत करावी. पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन काकडीसाठी उत्तम असते.

Cucumber Sowing | Agrowon

बियाणे आणि अंतर

हेक्टरी १ ते १.५ किलो बियाणे पुरेसे असते. लागवड अंतर १ मीटर बाय ०.५ मीटर ठेवून १-२ इंच खोल पेरणी करावी.

Seeds and Spacing | Agrowon

सुधारित वाणांची निवड

चांगल्या उत्पादनासाठी योग्य वाण निवडणे महत्त्वाचे आहे. हिमांगी आणि फुले शुभांगी हे सुधारित वाण फायदेशीर ठरतात.

Improved Varieties of Cucumber | Agrowon

सेंद्रिय खतांचा वापर

पूर्वमशागतीत ८ टन कुजलेले शेणखत द्यावे. यामुळे माती सुपीक राहते आणि उत्पादन वाढते.

Use of Organic Fertilizer | Agrowon

रासायनिक खते

लागवडीपूर्वी २०:२०:२० प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश द्यावे. लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी नत्राची वरखत द्यावी.

Chemical Fertilizers for Cucumber | Agrowon

आंतरमशागत आणि पाणी

दर १५-२० दिवसांनी खुरपणी करून तण नियंत्रण करावे. उन्हाळ्यात ८-१० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

Water management | Agrowon

काढणी आणि उत्पादन

लागवडीनंतर ४५-५० दिवसांनी काढणी सुरू होते. योग्य काळजी घेतल्यास १५ ते २० टन प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

Harvesting and Yield | Agrowon

Watermelon Harvesting: कलिंगडची काढणी करण्याची योग्य वेळ कोणती?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...