Watermelon Harvesting: कलिंगडची काढणी करण्याची योग्य वेळ कोणती?

Swarali Pawar

योग्य वेळी काढणी

उन्हाळ्यात कलिंगडाला बाजारात चांगली मागणी असते. पण गोड आणि दर्जेदार फळ मिळवण्यासाठी योग्य काळजी आणि वेळेवर काढणी खूप महत्त्वाची असते.

Watermelon Maturity Signs | Agrowon

फळधारणेनंतरची काळजी

फळ लागल्यानंतर पाण्याचा ताण येऊ देऊ नका, पण जास्त पाणीही देऊ नका.
पोटॅशयुक्त खतांचा वापर केल्यास फळाची गोडी आणि वजन वाढते.

Watermelon Maturity Signs | Agrowon

काढणीपूर्वी पाण्याचा ताण

काढणीच्या काही दिवस आधी पाणी थोडे कमी दिल्यास गोडी वाढते. यामुळे फळाचा दर्जा सुधारतो आणि बाजारभाव चांगला मिळतो.

Watermelon Maturity Signs | Agrowon

उन्हापासून संरक्षण कसे कराल?

एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हामुळे फळांवर डाग पडू शकतात. फळांवर पेंढे, गवत किंवा पानांचे आच्छादन करून त्यांना वाचवा.

Watermelon Maturity Signs | Agrowon

पक्वतेची पहिली खूण

फळाच्या देठाजवळील बाळी पूर्ण सुकलेली दिसली तर फळ तयार झालेले असते. देठ हिरवा न राहता तपकिरीसर झाला तरी काढणीची वेळ समजा.

Watermelon Maturity Signs | Agrowon

आवाजावरून ओळखा

पिकलेल्या कलिंगडावर हलके ठोकल्यास मंद, भरलेला ‘बद’ आवाज येतो. कच्च्या फळावर ठोकल्यास तीक्ष्ण, धातूसारखा आवाज ऐकू येतो.

Watermelon Maturity Signs | Agrowon

रंग आणि सालीवरून ओळख

जमिनीला लागलेला भाग पांढरा न राहता पिवळसर झाला तर फळ तयार आहे. पिकलेल्या फळाची साल थोडी खडबडीत वाटते, तर कच्ची गुळगुळीत असते.

Watermelon Maturity Signs | Agrowon

काढणी आणि बाजारासाठी टिप्स

फळे धारदार सुरीने सकाळी कापून घ्या आणि सावलीत ठेवा. वाहतुकीत पेंढ्याचा थर द्या आणि आकारानुसार प्रतवारी करूनच बाजारात पाठवा

Watermelon Maturity Signs | Agrowon

Cucumber Benefits: उन्हाळी आहारात काकडीचा समावेश का करावा? जाणून घ्या कारणं!

Agrowon
अधिक माहितीसाठी..