NPK Ratio For Crops: सर्व पिकांना एकच खत योग्य नाही! जाणून घ्या NPK चे योग्य सूत्र

Swarali Pawar

सर्व पिकांना समान खते देताय?

प्रत्येक पिकाची अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. म्हणून पिकानुसार खतांचे प्रमाण बदलणे गरजेचे आहे.

Precision Agriculture | Agrowon

तृणधान्यांना जास्त नत्र

भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मक्याला नत्राची गरज जास्त असते. या पिकांसाठी ४:२:१ (नत्र:स्फुरद:पालाश) प्रमाण उपयुक्त ठरते.

Precision Agriculture | Agrowon

कडधान्यांना जास्त स्फुरद

मूग, तूर, हरभरा यांसारखी पिके हवेतले नत्र स्थिर करतात. म्हणून त्यांच्यासाठी १:२:१ किंवा १:२:२ प्रमाण योग्य मानले जाते.

Precision Agriculture | Agrowon

तेलबियांना गंधकही महत्त्वाचे

सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफुलाला गंधकाची गरज असते. यामुळे तेलाचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

Precision Agriculture | Agrowon

तेलबियांसाठी NPK सूत्र

तेलबिया पिकांसाठी ३:२:१ (नत्र:स्फुरद:पालाश) प्रमाण उपयुक्त असते. यासोबत गंधकाचा पुरवठा करणे फायदेशीर ठरते.

Precision Agriculture | Agrowon

कंद आणि फळपिकांना जास्त पालाश

बटाटा आणि केळीसारख्या पिकांना पालाशाची गरज अधिक असते. पालाशामुळे गुणवत्ता, आकार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Precision Agriculture | Agrowon

कंदपिकांसाठी योग्य प्रमाण

कंदवर्गीय आणि फळपिकांसाठी २:१:४ (नत्र:स्फुरद:पालाश) प्रमाण योग्य मानले जाते. यामुळे उत्पादन आणि दर्जा सुधारतो.

Precision Agriculture | Agrowon

माती परीक्षण विसरू नका

खतांचे नियोजन नेहमी माती परीक्षणाच्या अहवालानुसार करा. यामुळे खर्च कमी होतो आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते.

Precision Agriculture | Agrowon

Mung Varieties: कमी कालावधी, चांगले उत्पादन! मूग लागवडीसाठी ६ सुधारित वाण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...