Banana Kand Selection: कमी पावसात केळी लागवड? कंद निवडताना या गोष्टी तपासा!

Swarali Pawar

कमी पावसात केळी लागवड शक्य?

यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने योग्य नियोजन गरजेचे आहे. योग्य कंद आणि वाण निवडल्यास केळीचे पीक चांगले टिकू शकते.

Banana Drought Varieties | Agrowon

तग धरणारा वाण

पावसाचा खंड सहन करणाऱ्या जातींची निवड फायदेशीर ठरते. यामुळे कमी पाण्यातही बागेची वाढ स्थिर राहते.

Banana Drought Varieties | Agrowon

कमी कालावधीचे वाण

लवकर परिपक्व होणाऱ्या जातींवर पाण्याचा ताण कमी पडतो. साधारण वाणांपेक्षा लवकर तयार होणारे वाण निवडावेत.

Banana Drought Varieties | Agrowon

बुटके वाण का निवडावेत?

कमी उंचीच्या झाडांना पाण्याची गरज तुलनेने कमी असते. वादळ आणि वाऱ्यातही अशी झाडे अधिक चांगली टिकतात.

Banana Drought Varieties | Agrowon

रोगप्रतिकारक्षम वाण महत्त्वाचे

ढगाळ हवामानात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून सिगाटोका रोगाला प्रतिकारक वाण निवडणे गरजेचे आहे.

Banana Drought Varieties | Agrowon

कंद की उतिसंवर्धित रोपे?

कमी पाण्यात तज्ज्ञ कंद लागवडीला अधिक योग्य मानतात. कंद वातावरणाशी लवकर जुळवून घेत असल्याने टिकाव चांगला राहतो.

Banana Drought Varieties | Agrowon

कंद निवडताना काय पाहाल?

कंद ३ ते ४ महिन्यांचे आणि ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे असावेत. त्यांचा आकार उभट आणि नारळासारखा असणे फायदेशीर ठरते.

Banana Drought Varieties | Agrowon

फुले प्राईड ठरतो फायदेशीर

हा वाण कमी उंचीचा असून कमी पाण्यातही चांगला तग धरतो. सिगाटोका रोगाला प्रतिकारक असल्याने उत्पादन स्थिर मिळते.

Banana Drought Varieties | Agrowon

Soil Testing: खतांची बचत करायची? मग माती परीक्षण अनिवार्य!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी..