Mahur Tambul : माहूरच्या रेणुकादेवीच्या प्रसादातील सुगंधी तांबुल बनतो कसा?

Team Agrowon

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील मुख्य प्रसादात समावेश असलेल्या ‘तांबूल’ ला भौगोलिक मानांकन मिळाल आहे.

Mahur Tambul | Agrowon

पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर तांबूलाचा प्रसाद देवीला दाखविला जातो.

Mahur Tambul | Agrowon

तांबूल देवीच्या मुखात तांबुल ठेवून त्यातील अर्धा भाग भक्त प्रसाद म्हणून सेवन करतात. याशिवाय अनेक जण सहा महिने, वर्षभर पुरेल एवढा तांबूल विकतही घेऊन जातात.

Mahur Tambul | Agrowon

नागवेलीची पाने, काथ, सुपारी, चुना, बडीशेप, ओवा, लवंग, विलायची, कलमी, ज्येष्ठमध, जायपत्री, आसमान तारा, चमन बहार असे साहित्य वापरून तांबूल तयार केले जाते.

Mahur Tambul | Agrowon

तांबूल कुटण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कोदवा दगड वापरला जातो, तोही याच परिसरात मिळतो.

Mahur Tambul | Agrowon

विड्याची पाने विडूळ (ता. उमरखेड) तसेच शेजारील तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातून आणली जातात. आता माहूर परिसरातील लांजी, गुंडवळ अशा काही गावांत ही पाने उपलब्ध होत आहेत.

Mahur Tambul | Agrowon

या तांबूलला ‘त्रयोदशी गुणी’ विडाही म्हटले जाते. याचे महत्त्व आयुर्वेदातही सांगितले आहे.

Mahur Tambul | Agrowon

पचनास गुणकारी, रक्तशुद्धीकरण तसेच खोकल्यावर उपयुक्त हा विडा मानला जातो. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी विडा, तांबूल वापरतात.

Mahur Tambul | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.