Mahesh Gaikwad
तुम्हाला जर खरा भारत पाहायाचा असेल तर तो गाव-खेड्यांमध्ये वसलेला आहे, असे आपण म्हणतो.
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ७२ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते.
भारतात ६ लाखांहून अधिक गावं आहेत. पण तुम्हाला भारतातील सर्वात लहान गावाबद्दल माहित आहे का?
भारतातले सर्वात छोटे गाव अरूणाचल प्रदेश या राज्यात आहे.
या गावाचे नाव सुध्दा एकच अक्षरी आहे. हे गाव 'हा' या नावाने ओळखले जाते.
२०११ च्या जनगणनेनुसार, या गावामध्ये एकूण ५८ कुटूंब राहत असल्याची नोंद आहे.
जनगणनेवेळी या गावाची लोकसंख्या २८९ एवढी नोंदवली गेली आहे.