Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे कसे दूर कराल? माहित आहे का हे उपाय?

Aslam Abdul Shanedivan

घरगुती उपाय

थर्टी फर्स्ट आणि विविध कार्यक्रमांसाठी जायचं आहे. मात्र डोळ्यांखालील डार्क सर्कलमुळे कसंतरी वाटतयं. हे तुम्ही दूर करू शकता. त्यासाठी हे घरगुती उपाय

Dark Circles | agrowon

काकडीचे तुकडे

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांसाठी काकडी अतिशय चांगला उपाय आहे. काकडीचे तुकडे बंद डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

Dark Circles | agrowon

टी बॅग्स

ग्रीन टी पित असाल तर टी बॅग्स नक्कीच फेकत असाल. त्या फेकून देऊ नका. या पिशव्या 10-15 मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यास मदत करतात.

Dark Circles | agrowon

बटाट्याचा रस

बटाटे हे आहारात जेवढे उपयोगी आहेत तेवढेच त्वचेसाठी देखील लाभदायक ठरतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बट्याटाचा रस हा कॉटन पॅड वापरून डोळ्यांखाली ठेवल्यास डार्क सर्कल कमी होतात. यासाठी बटाट्यातील ब्लीचिंग गुणधर्म उपयुक्त ठरतात.

Dark Circles | agrowon

बदामाचे तेल

झोपायच्या आधी थोड्या प्रमाणात बदामाचे तेल डोळ्यांभोवती लावा, रात्रभर असेच राहू द्या, सकाळी छान मऊ, उजळ झालेली त्वचा तुम्हाला दिसून येईल.

Dark Circles | agrowon

कोरफड

कोरफड त्वचेवर उपचार करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. डोळ्यांच्याखाली ताज्या कोरफड लावल्याने वर्तुळे कमी होण्यासह त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

Dark Circles | agrowon

गुलाब पाणी

गुलाब पाणी कापसात भिजवून 15-20 मिनिटे डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांभोवतालचा फुगीरपणा कमी होण्यास आणि त्वचा पुन्हा टवटवीत होण्यास मदत होते.

Dark Circles | agrowon

Benefits Cherries : चेरी फळ आपल्यासाठी वरदानच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Benefits Cherries | agrowon