Aslam Abdul Shanedivan
बदल्या जीवनशैलीत अनेकांमध्ये लठ्ठपणा हाय बीपी आणि शुगर सारखे आजार सर्सास दिसून येतात
तर लठ्ठपणा असो की हाय बीपी किंवा पित्त यावर घरातल्या फ्रिजमधील फक्त एक ग्लास थंड दूध उपायकारक आहे.
दूध हे संपूर्ण अन्न असून यात कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. तर दूध हाडे मजबूत ठेवण्याबरोबरच आरोग्याला अनेक फायदे देतं
दगदग कमी झोप आणि इतर कारणांनी अॅसिडिटीची समस्या वाढल्यास थंड दुधाचे सेवन करा. थंड दुधामुळे पोटातील आम्लता नियंत्रित होऊन पोटाची जळजळ दूर होते
थंड दुधात व्हिटॅमिन बी १२ शरीराराला ऊर्जा प्रदान करते. तसेच थंड दूध प्यायल्याने मानसिक ताण-तणाव दूर होतो
वजन कमी करण्यासाठी गरम दुधाऐवजी थंड दूध लाभदायक ठरते. थंड दूध प्यायल्याने चयापचय वाढून अतिरिक्त कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
हाय बीपी नियंत्रित करण्याचे काम थंड दूध करते. दुधातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.