Aslam Abdul Shanedivan
खाण्यात बदल, दगदग, कमी झोप अशा कारणांमुळे अनेकांना पित्ताचा त्रास उद्भवतो.
चवीला तुरट असणारा आवळा कफ आणि पित्तरोधक असतो. यातील व्हिटॅमिन सीमुळे पोट स्वच्छ होऊन पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत मिळते
पित्तामुळे जळजळ वाढते. त्यामुळे भूक लागत नाही. अशा वेळी मुगाचं साधं वरण आणि भात तूप घालून खाल्ल्यास त्रास कमी होतो.
उष्ण आणि तिखट असणारं आलं हे पित्तशामक असून त्यामुळे आम्लपित्त कमी होते. तर लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सीमुळे पित्तशय स्वस्थ होते.
आमसूल किंवा कोकम हे घरात हमखास उपलब्ध असतेच. कोकममधील व्हिटॅमिन सी पित्त शमंन करतं.
थंड दूध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित खडीसाखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.
केळ खाल्ल्याने शरीराला पोटॅशियम मिळण्याबरोबरच आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच पचन क्रिया वेगवान होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.