Team Agrowon
जनावरांना टॅगिंगद्वारे ओळख देणे हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु अजूनही बरेच पशुपालक टॅगिंग करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होते.
टॅगिंगमुळे जनावरांची वंशावळ जपली जाते. चांगल्या वंशावळीच्या जनावरांची निवड करणे सोपे होते. कमी उत्पादनक्षम जनावर ओळखता येते.
नेहमीच्या आढळणाऱ्या समस्या ओळखता येतात आणि आपले नुकसान टाळण्यासाठी अशी कमी उत्पादनक्षम जनावरे कळपातून काढून टाकण्यास मदत होते.
टॅगिंगमुळे गोठ्यातील जनावरांचे शारीरिक अवस्थेनुसार वर्गीकरण करता येते. वेगवेगळे व्यवस्थापन करणे सोईस्कर होते. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होते.
आपल्या गोठ्यातील एखादे जनावर दगावल्यास टॅगिंग असेल तर सरकारकडून आर्थिक मदत मिळवणे, विमा रक्कम मिळवणे किंवा काही सवलती मिळविण्यास मदत होते.
एखादे जनावर हरवल्यास शोधून काढण्यास मदत होते. पशुधन स्पर्धा, पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी मदत होते.
आजारी जनावरांची नोंद राहून जनावर मालकाच्या गैरहजरीमध्ये पशुवैद्यकास उपचार करणे सोईस्कर होते. जनावर कोणालाही विक्री केल्यास हवे त्या वेळी शोधण्यास मदत होते. जनावरांचा दाखला बनवण्यास मदत होते.