Homemade Chocolate Recipe : कोको पावडरपासून घरच्या घरी चॉकलेट बनवण्याची स्टेप-बाय-स्टेप सोपी पद्धत

Anuradha Vipat

अत्यंत सोपे

घरी शुद्ध, केमिकलमुक्त आणि आवडीनुसार गोड असलेले चॉकलेट बनवणे अत्यंत सोपे आहे.

Homemade Chocolate Recipe | Agrowon

मलाईदार चॉकलेट

बाजारातील महागडे चॉकलेट आणण्याऐवजी तुम्ही फक्त ३ ते ४ साहित्यांचा वापर करून घरच्या घरी मार्केटसारखे मलाईदार चॉकलेट बनवू शकता.

Homemade Chocolate Recipe | Agrowon

साहित्य

कोको पावडर ,नारळाचे तेल किंवा अनसॉल्टेड बटर ,पिठीसाखर,वेलची पूड किंवा व्हॅनिला इसेन्स,ड्रायफ्रूट्स किंवा नट्स.

Homemade Chocolate Recipe | Agrowon

डबल बॉयलर

पातेल्यात १-२ ग्लास पाणी उकळत ठेवा. त्यावर काचेचा किंवा स्टीलचा मोठा बाऊल ठेवा पाण्याला टेकणार नाही याची काळजी घ्या. या पद्धतीला 'डबल बॉयलर' म्हणतात.

Homemade Chocolate Recipe | agrowon

बटर किंवा तेल

वरच्या बाऊलमध्ये १/२ वाटी अनसॉल्टेड बटर किंवा नारळाचे तेल टाका आणि ते पूर्णपणे वितळू द्या. त्यात १/२ वाटी पिठीसाखर घालासाखर तेलात पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने सतत ढवळत राहा.

Homemade Chocolate Recipe | Agrowon

कोको पावडर मिक्स करा

यात १/२ वाटी कोको पावडर चाळून टाका. मिश्रण चमच्याने किंवा व्हिस्कने सतत ढवळत राहा, मिश्रणात एकही गुठळी राहता कामा नये. सर्व साहित्य एकजीव झाल्यावर गॅस बंद करा. तयार झालेले कोमट चॉकलेटचे मिश्रण सिलिकॉनच्या चॉकलेट मोल्डमध्ये ओता.

Homemade Chocolate Recipe | Agrowon

फ्रिजमध्ये ठेवा

हा मोल्ड २ ते ३ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. ३ तासांनंतर चॉकलेट पूर्णपणे कडक होईल. मोल्डमधून चॉकलेट हलक्या हाताने बाहेर काढा.

Homemade Chocolate Recipe | Agrowon

Pomegranate Peel : अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? फेकून न देता अशा प्रकारे वापरा डाळिंबाची साल!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Peel | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...