Pomegranate Peel : अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? फेकून न देता अशा प्रकारे वापरा डाळिंबाची साल!

Anuradha Vipat

अमृतासारखी काम

डाळिंबाचे दाणे आरोग्यासाठी आणि रक्ताभिसरणासाठी जेवढे फायदेशीर आहेत, तेवढीच त्याची साल त्वचेसाठी अमृतासारखी काम करते.

Pomegranate Peel | agrowon

अत्यंत प्रभावी

डाळिंबाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिटेनोल्स भरपूर प्रमाणात असतात, जे चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि वाढत्या वयाची लक्षणे रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जातात.

Pomegranate Peel | agrowon

पावडर कशी बनवावी?

सर्वात आधी डाळिंबाची साले उन्हात २-३ दिवस चांगली वाळवून घ्या. साले कडक वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर बनवा आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.

Pomegranate Peel | agrowon

डाळिंबाची साल आणि कच्च्या दुधाचा अँटी-एजिंग पॅक

डाळिंबाच्या सालीच्या पावडरीमध्ये आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावून १५-२० मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने त्वचा घट्ट होते.

Pomegranate Peel | agrowon

डाळिंबाची साल आणि गुलाबाचे पाणी

डाळिंबाच्या सालीची पावडर आणि २ चमचे गुलाबाचे पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा.

Pomegranate Peel | Agrowon

डाळिंबाची साल आणि दह्याचा पॅक

डाळिंबाच्या सालीची पावडर आणि २ चमचे ताजे दही एकत्र करा. हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे ठेवा आणि नंतर हलक्या हाताने मसाज करत चेहरा धुवा.

Curd Benefits In Summer | Agrowon

डाळिंबाच्या सालीचा चहा

१ ग्लास पाण्यात अर्धा चमचा डाळिंबाच्या सालीची पावडर टाकून पाणी चांगले उकळून घ्या. हे पाणी गाळून घ्या आणि त्यात थोडे मध किंवा लिंबाचा रस मिक्स करून चहासारखे प्या.

Pomegranate Peel | agrowon

Gold Peel Off Mask Benefits : लग्नघाईत पार्लरला जायला वेळ नाही? इन्स्टंट ग्लोसाठी ट्राय करा ‘हा’ गोल्ड पील-ऑफ मास्क

Gold Peel Off Mask Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...