Mahesh Gaikwad
अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात या वनस्पतीचे विशेष महत्त्व आहे.
आरोग्याशी संबंधित समस्यांवर अश्वगंधाचा वापर रामबाण उपायाप्रमाणे आहे.
अश्वगंधा वनस्पतीच्या विविध भागांमध्ये अल्कलाईड, स्टिरॉइड्स या सारखे रासायनिक घटक असतात.
अश्वगंधाच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासोबतच सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवरही अश्वगंधा गुणकारी आहे.
स्नायूंचा कमकुवतपणा, निद्रानाश, वेदनादायक सूज या समस्या अश्वगंधाच्या सेवनामुळे दूर होण्यास मदत होते.
याशिवाय लैंगिक आरोग्याच्या समस्यांसाठीही अश्वगंधा रामबाण उपाय आहे. याच्या सेवनाने लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
रात्री व्यवस्थित झोप येत नसल्याच्या समस्येवरही अश्वगंधा गुणकारी मानली जाते.