Rabi Drought Management: एल निनोमध्ये रब्बीचे नियोजन! कमी पाण्यात पीक घेण्यासाठी ८ टिप्स

Swarali Pawar

कमी क्षेत्र, चांगले उत्पादन!

एल निनोच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता मर्यादित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करा. जास्त क्षेत्रावर पेरणी करण्याऐवजी उपलब्ध ओलाव्यानुसार कमी क्षेत्रातून चांगले उत्पादन मिळवण्यावर भर द्या.

Rabi in El Nino | Agrowon

ओलावा पाहून पेरणी!

जमिनीचा प्रकार, खोली, उपलब्ध ओलावा, सिंचनाची सोय आणि हवामानाचा अंदाज पाहून पीक निवडा. पुरेसा ओलावा नसल्यास पेरणीची घाई करू नका आणि पाऊस झाल्यानंतर योग्य ओलावा मिळताच पेरणी करा.

Rabi in El Nino | Agrowon

जमिनीनुसार पीक!

हलकी जमीन कमी ओलावा धरून ठेवते, त्यामुळे ओलावा अपुरा असल्यास पेरणी टाळा. परिस्थितीनुसार करडई, रब्बी ज्वारी, जवस किंवा चारा पिकांचा विचार करा, तर मध्यम ते खोल काळ्या जमिनीत हरभरा, ज्वारी आणि करडई घेता येते.

Rabi in El Nino | Agrowon

वाण कमी कालावधीचे!

पेरणीला उशीर झाल्यास कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांना आणि वाणांना प्राधान्य द्या. गव्हाचे क्षेत्र वाढवण्यापूर्वी खात्रीशीर सिंचन उपलब्ध आहे का, हे तपासा.

Rabi in El Nino | Agrowon

नियोजन उपलब्ध पाण्याचे!

शेततळे, विहीर आणि बोअरवेलमधील पाण्याचा अंदाज घेऊन किती क्षेत्राला पाणी देता येईल, हे ठरवा. संरक्षित सिंचन उपलब्ध असल्यास फुलोरा आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी देण्याला प्राधान्य द्या.

Rabi in El Nino | Agrowon

मशागत कमी, ओलावा जास्त!

खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर अनावश्यक खोल मशागत टाळा, जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहील. पीक अवशेष जाळण्याऐवजी आच्छादनासाठी वापरा आणि बांधांची दुरुस्ती करून पाणी वाहून जाण्याचे मार्ग नियंत्रित करा.

Rabi in El Nino | Agrowon

पेरणीपूर्वी बियाणे तपासा!

शक्य असल्यास घरचे चांगल्या प्रतीचे बियाणे वापरा आणि पेरणीपूर्वी त्याची उगवणक्षमता तपासा. हरभऱ्यासारख्या द्विदल पिकांना रायझोबियम, तर ज्वारीसारख्या एकदल पिकांना शिफारशीनुसार अझोटोबॅक्टरची बीजप्रक्रिया करा.

Rabi in El Nino | Agrowon

खतांचा वापर विचारपूर्वक करा!

माती परीक्षणानुसार खतांची मात्रा ठरवा आणि ओलावा कमी असताना नत्राचा अवाजवी वापर टाळा. योग्य पीक निवड, वेळेवर पेरणी, बीजप्रक्रिया आणि पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीत नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.

Rabi in El Nino | Agrowon

Drought Farming: दुष्काळात रब्बी ज्वारीची लागवड कशी करावी? महत्त्वाच्या टिप्स

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी..