Tomato Fruit Borer: टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी रोखण्यासाठी सोपे उपाय

Swarali Pawar

अळी ओळखा!

सध्या टोमॅटो पिकावर फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढतोय. वेळेवर उपाय केले तर मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.

Pest Identification | Agrowon

ही अळी ओळखायची कशी?

ही अळी हिरवट किंवा तपकिरी रंगाची असते आणि शरीरावर रेषा दिसतात. मोठी झाल्यावर ती थेट फळाला भोक पाडते.

Tomato borer Symptoms | Agrowon

नुकसान कसं करते?

लहान अळी पानं खाते, पण मोठी अळी फळात शिरून आतला गर खाते. एक अळी २ ते ८ फळांचं नुकसान करू शकते.

Crop Damage | Agrowon

शेतीत आधी काय कराल?

उन्हाळ्यात खोल नांगरणी करा म्हणजे जमिनीतील किड मरतात. तसंच कीडग्रस्त फळं वेचून नष्ट करा.

Control Measures | Agrowon

सापळा पीक आणि पक्षी मदतीला!

१६ ओळी टोमॅटोनंतर २ ओळी झेंडू लावा. शेतात पक्षिथांबे उभारल्यास पक्षी अळ्या खातात.

Traditional Method | Agrowon

कामगंध सापळे लावा

एकरी ५ ते ६ फेरोमोन सापळे लावा. दर १५ दिवसांनी त्यातील गंध बदला म्हणजे कीड नियंत्रणात राहते.

Mechanical Control | Agrowon

जैविक उपाय वापरा

अळी दिसताच निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन फवारणी करा. लहान अवस्थेत एचएनपीव्ही किंवा बिव्हेरिया वापरल्यास चांगला परिणाम दिसतो.

Biological Control | Agrowon

रासायनिक फवारणी

आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तरच शिफारशीत कीटकनाशके आलटून-पालटून वापरा. फवारणी नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.

Chemical Management | Agrowon

Early Mrig Banana: आगाप मृग केळीची योग्य लागवड; उन्हाळ्यातही घ्या भरघोस उत्पादन!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...