Swarali Pawar
फेब्रुवारी-मार्चमध्ये केळीची आगाप मृग लागवड केली जाते. पण पुढील एप्रिल-मेच्या उष्णतेत योग्य निगा राखणे खूप गरजेचे असते.
उतिसंवर्धित रोपे १ ते १.५ फूट उंच आणि ४–६ पानांची असावीत. रोपे मजबूत आणि निरोगी असतील तर वाढ चांगली होते.
३ ते ६ महिन्यांचे आणि ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे कंद निवडा. लागवडीपूर्वी औषधी द्रावणात ३० मिनिटे बुडवणे विसरू नका.
‘श्रीमंती’ आणि ‘फुले प्राईड’ वाण १.५ मी. × १.५ मी. अंतरावर लावा. लागवडीपूर्वी ठिबक सिंचन बसवणे फायदेशीर ठरते.
प्रति झाड १० किलो शेणखत किंवा ५ किलो गांडूळखत द्या. सोबत जैविक खते वापरल्यास वाढ अधिक चांगली होते.
लागवडीनंतर ३० दिवसांत युरिया, स्फुरद आणि पालाश द्या. नंतर ७५ व १२० दिवसांनी युरियाची मात्रा द्यावी.
ठिबक सिंचनातून आठवड्याला शिफारशीत खते द्या. ही प्रक्रिया सलग १६ आठवडे केल्यास चांगले उत्पादन मिळते.
पहिल्या ४ महिन्यांत प्रति झाड दररोज ४.५ ते ६.५ लिटर पाणी द्या. उन्हाची तीव्रता पाहून पाण्याची मात्रा वाढवू शकता.