Mulshi Dam : मुळशी धरणाची उंची वाढणार!; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

Aslam Abdul Shanedivan

Mulshi Damपाण्याची व्यवस्था

पुण्याच्या पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था फार महत्वाची आहे

Mulshi Dam | Agrowon

उपमुख्यमंत्री अजित पवार

त्यासाठी पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढविण्यासाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Mulshi Dam | Agrowon

मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना

याबाबात अजित पवार यांच्या दालनात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा एक व टप्पा दोन मधील अडचणी दूर करण्यासाठी बैठक झाली

Mulshi Dam | Agrowon

मुळशी धरणाची उंची

मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढवली जाणार आहे

Mulshi Dam | Agrowon

विनामोबदला जमीन

उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीपैकी ८० टक्के जमीन टाटा पॉवर कंपनीच्या क्षेत्रातील असून ती विनामोबदला देण्याची विनंती केली जाणार आहे

Mulshi Dam | Agrowon

२० टक्के जमीन अधिग्रहण

उर्वरित २० टक्के जमीन शासनाच्या वतीने अधिग्रहण करत त्याचा जमीनधारकांना योग्य मोबदला देण्यात यावा, असे निर्देशही पवार यांनी दिले आहेत.

Mulshi Dam | Agrowon

पौड येथील पाणीपुरवठा योजना

तसेच पौड येथील पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ‘पीएमआरडीए’ने ही जागा अधिग्रहण करून उपलब्ध करून घ्यावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.

Mulshi Dam | Agrowon

Bael Health Benefits : कमी ऐकू येण्याच्या समस्येवर बेलफळ आहे गुणकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा